अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेने, आपल्या गुणवत्ता पुर्ण शिक्षणाणे देशात लौकिक मिळविले आहे. ह्या संस्थे अंतर्गत, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संपुर्णपणे वाव देण्यासाठी, युवा सांस्कृतिक महोत्सव "मेधा" चे आयोजन केल्या जाते. यावर्षी हा भव्य सांस्कृतिक महोत्सव, दिनांक ५, ६ आणि ७ जानेवारी २०१७ रोजी आयोजित करण्यात आला असून ह्याची संकल्पना युवा नेते राजवर्धन थोरात व संस्थेच्या संचालिका सौ. शरयुताई देशमुख ह्यांनी केली आहे.
अमृतवाहिनी मधील भव्य वसंत दादा क्रिडा संकुल व सांस्कृतिक मंचवर होत असलेल्या या युवा महोत्सवाचे युवकांना मोठे आकर्षण ठरले आहे. विद्यार्थ्यांसाठी एक मोठे व्यासपीठ असलेल्या या "मेधा" महोत्सवात यावेळी विद्यार्थ्यांमधील "टॅलेंट सर्च" साठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जसे कि,
- मिमिक्री
- डान्स
- ग्रुप डान्स
- गायन
- ड्रामा
- वादन
- पेन्टींग
- व्याख्याने इत्यादी.
हा संपूर्ण उपक्रम पुर्णपणे विद्यार्थ्यांनीच आयोजित केला असून उत्तर महाराष्ट्रात हा एक सर्वात मोठा युवा महोत्सव म्हणून नावाजलेला आहे. ह्या महोत्सवाची आखणी पुढील प्रमाणे:
दिनांक
|
कार्यक्रम
|
उपस्थिति
|
५ जानेवारी
|
महोत्सवाचे उद्घाटन
व
सांस्कृतिक कार्यक्रम
|
आ.बाळासाहेब थोरात, आ.डॉ.सुधीर तांबे,
उद्योजक विठ्ठल कामत, सौ.शरयुताई देशमुख,
युवा नेते राजवर्धन थोरात
|
६ जानेवारी
|
व्याख्यान
व
झी युवा चॅनेलचा कार्यक्रम - युवागिरी
|
आयपीएस अधिकारी विश्वास नागरे,
झी.24 तासचे संपादक डॉ.उदय निरगुडकर
|
७ जानेवारी
|
पारितोषीक वितरण सोहळा
|
अभिनेता सुपरस्टार संजय दत्त
|
मागील वर्षी "मेधा" मध्ये अनेक दिग्गजांची उपस्थिती प्रमुख ठरली. जसे कि :
- माजी महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात
- आ.डॉ.सुधीर तांबे
- हिंदी चित्रपट अभिनेता विवेक ओबेरॉय
- सिनेअभिनेत्री तेजा देवकर, ऋतुजा देशमुख, स्मिता शेवाळे, प्रियंका वामन
- सिनेअभिनेते राहूल सोलापूरकर इत्यादी.
हा महोत्सव यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक, प्राचार्यवर्ग, अमृतवाहिनी संस्थे अंतर्गत येणारे सर्व महाविद्यालय, मॉडेलस्कूल, इंटरनॅशनल स्कूल, ज्युनिअर कॉलेज, शिक्षक, विद्यार्थी व स्वयंसेवक विशेष प्रयत्न करत आहेत.
तरी या महोत्सवासाठी तालुक्यातील व जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक, नागरिकांनी व पालकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.
स्पर्धेसाठी नाव नोंदवण्याची शेवटची तारीख: २६ डिसेंबर, २०१६
अधिक माहिती साठी संपर्क:
प्रा. डॉ. मनोज चौधरी- ९९७००६६३५७
प्रा. सत्यजित थोरात - ९९७५८४४०८०
0 Comments